⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर रेल्वे उड्डाणपूलाचे लवकरच होणार व्हर्चुअल लोकार्पण

अमळनेर रेल्वे उड्डाणपूलाचे लवकरच होणार व्हर्चुअल लोकार्पण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । अमळनेर येथील चोपडा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास येऊन हा पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना लवकरच या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरींच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने होणार असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली आहे.

याबाबत आ.अनिल पाटील हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर असताना आ.अनिल पाटील यांनी पाडळसरे धरणाच्या निमित्ताने ना.गडकरी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी अमळनेर येथील नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास आल्याने या पुलाचे लोकार्पण करण्यासाठी तारीख मिळावी अशी विनंती आ.अनिल पाटील यांनी केली होती. तसेच माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांनी देखील आ.अनिल पाटील यांच्या वतीने उड्डाण पुलाचे लवकर लोकार्पण करावे अशी विनंती ना.गडकरी यांना केली होती. त्यामुळे ना.गडकरी यांनी लवकरच तारीख कळविली जाईल असे आश्वासन आमदारांना दिले होतें.दरम्यान ना.गडकरी यांच्या जळगाव जिल्ह्या दौऱ्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून ते जळगाव येथून विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण व्हर्च्युअल पद्धतीने करणार आहेत, त्यात अमळनेर येथील उड्डाणपूलाचे लोकार्पण देखील समाविष्ट केले असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांना केंद्रीय स्तरावरून कळविण्यात आली आहे.येत्या एक दोन दिवसात अधिकृत तारीख आपल्याला प्राप्त होणार असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान आ.अनिल पाटील यांचे अनेक वर्षांपासून ना.गडकरी यांच्याशी विशेष पारिवारिक संबंध असून या संबंधामुळे केंद्रीय स्तरावरील अनिल पाटील यांचे कोणतेही काम असो ना गडकरी यांची विशेष मदत त्यांना होत असते,पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश करण्यासाठी देखील ना गडकरी आमदारांना सहकार्य करीत असून आता उड्डाणपूलाच्या लोकार्पणाचीही ग्वाही दिल्याने राजकारणात पक्षविरहीतही अनेक चांगल्या गोष्टी घडतात हेच यातून स्पष्ट झाले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह