युवासेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिवपदी विराज कावडीया

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२१ । युवासेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिवपदी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवाशक्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष विराज कावडिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून वरूण सरदेसाई यांच्या हस्ते कावडिया यांना याचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.

विराज कावडिया यांनी गत महापालिका निवडणूक शिवसेनेतर्फे लढविली होती. यात त्यांना अपयश आले होते. तर अलीकडेच्या त्यांना स्वीकृत नगरसेवकपद जाहीर करण्यात आले असून तांत्रिक अडचणींमुळे याच्या अधिकृत घोषणेत अडसर निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमिवर, कावडिया यांना युवासेनेत महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीचे अभिनंदन व स्वागत माजी मंत्री सुरेश जैन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना वितरक कुणाल दराडे, अजिंक्यजी चुंभळे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराजजी पाटील व सर्व शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्याने यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज