fbpx

शाहू नगरात दोन गटात जोरदार हाणामारी… पहा व्हिडीओ…

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२१ । शहरातील शाहूनगर परिसरात घरासमोर कचरा टाकण्याच्या आणि महिलेकडे पाहतो या कारणावरून रात्री ८.३० वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली. दरम्यान, एका गटाने तलवारीने वार केल्याचा आरोप केला असून दोन जण जखमी झाल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दुसऱ्या गटाने महिलेने का पाहतो म्हणून विचारणा केल्याचा राग आल्याने मारहाण केल्याचे सांगितले.

शाहूनगर परिसरातील अलाउद्दीन काझी यांच्या दुकानाजवळ गटारीचा कचरा दुसऱ्याच्या अंगणात टाकण्यावरून आणि विवाहितेकडे का पाहतो म्हणून रात्री ८.३० वाजता दोन गटात तुफान हाणामारी झाली.

एका गटातील नासिर खान, साजिद खान व कदिर खान हे जखमी झाले आहेत. दरम्यान, दुसऱ्या गटातील विवाहित महिलेने माझ्याकडे का पाहतो म्हणून जाब विचारल्याच्या कारणावरून समोरील व्यक्तींनी मारहाण केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसून तक्रारदार शहर पोलिसात पोहचले आहे. दरम्यान, घटनास्थळी तलवारचा वापर झाला आणि दगडफेक करण्यात आल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला आहे.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज