जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली ; एरंडोल येथे रविवारी चार ठिकाणी भरला आठवडे बाजार.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोना च्या वाढत्या प्रमाणाचा पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आठवडे बाजार वर बंदी आणली असतानां २१ मार्च २१ या रविवारी ह्या आठवडे बाजाराच्या दिवशी एकाच ठिकाणी आठवडे बाजार न भरता वेगवेगळ्या चार ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यांची दुकाने थाटण्यात येऊन चक्क आठवडे बाजार भरला. यानिमित्ताने नागरिकांची गर्दी दिसून आली या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव वाढण्यास मदत झाली. तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

रविवारी एरंडोल येथे. म्हसावद नाका, बुधवार दरवाजा, रा.ती का बरे विद्यालयाजवळ, व ओम नगरमधील चौकात अशा चार ठिकाणी आठवडे बाजार भरण्यात आला. हा प्रकार चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणारा असल्याचे जाणकारांचे मत आहे. विशेष हे की एरंडोल शहरासह तालुक्यात ग्रामीण भागात कोरोना ने कहर केला असून. कोरोना रुग्णांची संख्या अधिकाधिक वाढत आहे. सर्व शासकीय यंत्रणा त्यासाठी अलर्ट झाल्या असून मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग चे पालन नियमांसह कोरोना चे सर्व नियम पाळण्यासाठी यंत्रणांकडून नुकतीच शहरातून मोहीम राबविण्यात आली व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली असे असतांना बिनदिक्कतपणे आठवडे बाजार भरून फळभाज्या व भाजीपाला खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. या प्रकारातून कोरोना ला आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले की काय. ते बोलले जात आहे.

बातमी शेअर करा
- Advertisement -

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar