यावलमध्ये विनोदकुमार पाटील यांचा विजय

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ ।  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावल येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून विद्यमान संचालक गणेश नेहेते यांना पराभूत करून चार मतांनी विनोदकुमार पंडित पाटील यांनी विजय मिळविला आहे.

सविस्तर असे की, जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावल विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान संचालक गणेश नेहेते यांचा सामना सहकार पॅनलचे विनोदकुमार पंडित पाटील यांच्याशी झाला. यात गणेश नेहते हे लागोपाठ दुसर्‍यांदा विजय संपादन करून जिल्हा बँक संचालक बनतील असे संकेत होते. मात्र निकालातून वेगळेच दिसून आले.

 

आज झालेल्या मतमोजणीत विनोद पाटील यांना २६ तर गणेश नेहेते यांना २२ मते मिळाली. यामुळे चार मतांनी विनोदकुमार पाटील यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेत संचालक म्हणून एंट्री केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज