fbpx

माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन मागे; राष्ट्रवादीत स्वागत

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२१ । राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले आहे. माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महानगराध्यक्ष विनोद देशमुख यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते पक्षाबाहेर होते. अलीकडच्या काळात विनोद देशमुख विरूद्ध विद्यमान महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यात वाद देखील पाहायला मिळाला.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात परिषदेत माजी पालकमंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष सतीश अण्णा पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष, माजी खासदार मनीष जैन, शहराध्यक्ष मंगला पाटील, संजय पवार, सुनील माळी, कल्पिता पाटील यांच्यासह इतर दिग्गज पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विनोद देशमुख यांचे निलंबन मागे घेत पुष्प देत त्यांचे पक्षात स्वागत केले.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आयोजित या पत्रकार परिषदेत अनेक दिग्गज दिसत दिसत असले तरी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील मात्र दिसून आले नाहीत.

पहा व्हिडीओ :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज