fbpx

ओझर शिवारात गावठी दारूची भट्टी उध्वस्त ; चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील ओझर शिवारातील गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर चाळीसगाव शहर पोलिसांनी दि 25 रोजी सकाळी छापा मारून गावठी दारूचे कच्चे, पक्के रसायन व तयार दारू असा एकूण एकुण 84 हजार150 रुपये किमतीचा  मुद्देमाल जप्त करुन त्याचा जागेवर नाश करण्यात आला असून 4 जणांवर चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mi advt

तालुक्यातील ओझर शिवारात शेतात गावठी दारूची भट्टी सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावर दि 25/04/2021 रोजी पोलीस निरीक्षक श विजयकुमार ठाकूरवाड सपोनि  सचिन कापडने, उपनिरीक्षक महावीर जाधव, हवालदार गणेश पाटील,अभिमान पाटील, पंढरीनाथ

पवार, प्रविण संगेले, विनोद भोई, विनोद खैरनार, भूषण पाटील, प्रकाश पाटील, सतिष राजपूत, भगवान माळी यांनी सकाळी 7 वाजेच्या सुमारास छापा मारून  ठिकाणावरुन 200 लिटर उकळते रसायण, 2625 लिटर कच्चे रसायन, 770 लिटर गावठी दारू असा एकुण 84,150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागेवर नाश करण्यात आला याप्रकरणी 4 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज