जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ डिसेंबर २०२१ । देवगांव देवळी ( ता. अमळनेर ) येथील महात्मा फुले हायस्कुलचे संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा येथील ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने शाल, बुके देऊनसत्कार करण्यात आला.
दरम्यान, विलासराव पाटील गेल्या तीस वर्षापासून अखिल भारतीय माळी महासंघात कार्य करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी वधूवर परिचय मेळावा, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, रक्तदान शिबीर असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत यांची अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. अमळनेरला ओबीसी शिक्षक असोसिएशनच्या वतीने शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी ओबीसी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, सल्लागार दशरथ सोमा लांडगे, जिल्हासंघटक प्रभाकर विंचूरकर, देवगाव देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, पत्रकार विनोद पाटील, लोकन्युजचे संपादक संभाजी देवरे, विजय पाटील, शशिकांत पाटील उपस्थित होते.