fbpx

वाघूर नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२१ । वाघूर धरणाची जलपातळी आज दुपारी तीन वाजता 233.79 मीटर झाली आहे. वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे.

येत्या 24 तासांत वाघूर धरणातील जलसाठा पूर्ण होण्याची शक्यता असल्याने धरणातून वाघूर नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्याची कार्यवाही होवू शकते. त्यामुळे वाघूर धरणाखालील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहून सावधानता बाळगावी, असा इशारा कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी दिला आहे. नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नये अथवा प्रवेश करू नये, असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे.

दरम्यान, आज दुपारनंतर शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु राज्यात पुढील दोन ते दिवस पावसाचा इशारा दिला असल्याने जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तविली आहे. मागील काही दिवसापासून झालेल्या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज