अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून शामकांत सोनवणे यांचा विजय

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून मतदारसंघातून शामकांत बळीराम सोनवणे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे. या माध्यमातून सोनवणे कुटुंबातील नवीन सदस्य जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आला आहे.

सविस्तर असे की, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना निवडणूक लढविण्यात अडथळा आला. यामुळे त्यांनी आपले बंधू शामकांत सोनवणे यांना येथून महाविकास आघाडीतर्फे उभे केले. यात पहिल्यापासून त्यांचे पारडे जड असल्याचे अधोरेखीत झाले. यात त्यांनी आज एकतर्फी विजय संपादन केला आहे. या माध्यमातून सोनवणे कुटुंबातील नवीन सदस्य जिल्हा बँकेत संचालक म्हणून निवडून आला आहे.

दरम्यान, ताज्या कलानुसार महाविकास आघाडीला जिल्हा बँक निवडणुकीत एकतर्फी यश मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात लवकरच मतमोजणी पूर्ण होणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज