नुकसानग्रस्त कोकणच्या धर्तीवर शासनाकडून मदत दिली जाईल- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा या तालुक्यात अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्तांना कोकणच्या धर्तीवर राज्य शासनाकडून मदत दिली जाणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सदर विषयाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला अतिरिक्त मनुष्यबळ लावून नुकसानीचे पंचनामे करुन प्रस्ताव तातडीने पाठविण्याची सांगण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पाचोरा भडगाव या तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तरपणे दिली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वरील प्रमाणे घोषणा केली चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे नुकसानग्रस्तांना तातडीने मदतची मागणी आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -