जेसीआय जळगाव सेंट्रलच्या अध्यक्षपदी वेणुगोपाल झंवर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । जेसीआय जळगाव सेंट्रलची वर्ष २०२२ ची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. अध्यक्षपदी वेणुगोपाल संदीप झंवर यांची तर सचिवपदी तुषार शिवदास बियाणी यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी दि.६ जानेवारी रोजी नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा होणार आहे.

माजी अध्यक्ष ऋषभ शाह, श्रेणिक जैन यांच्या निरीक्षणाखाली हि कार्यकारिणी निवड झाली आहे. नवीन कार्यकारिणीत वेणुगोपाल बिर्ला, पियुष शर्मा, अक्षय गादिया, प्रसाद झंवर, निखिल कटारिया, चेतन सेठ, शिवनाथ जांगीड, अभिलाष राठी, हर्षल मंडोरे, कल्पक सांखला यांचाहि या कार्यकारिणीत समावेश आहे. हि कार्यकारिणी गुरुवार दि. ६ जानेवारी रोजी सुरभी लॉन्स येथे पदग्रहण करणार आहे.

आगामी काळात विविध क्षेत्रात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी जेसीआय सेंट्रलतर्फे प्रयत्न केले जातील, अशी माहिती नूतन अध्यक्ष वेणुगोपाल झंवर यांनी दिली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -