‘वसुधैव कुटुंबकम’ हे भारतीय संस्कृतीचे वेगळेपण : डॉ. सिन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । संपूर्ण जग हे माझे कुटुंब आहे अशी निस्सीम आस्था ही भारतीय संस्कृतीचे वेगळेपण आहे. जगाच्या पाठीवर कोठेही गेलात तरी भारतीय संस्कृतीसारखी दुसरी महान संस्कृती शोधून सापडणार नाही, असे मत दिल्ली येथील आय.सी.पी.आरचे अध्यक्ष डॉ. आर.सी. सिन्हा यांनी तत्वज्ञान विभागातर्फे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी केले.

मू. जे महाविद्यालयातील तत्वज्ञान विभागातर्फे ‘२१ व्या शतकात उपनिषेदांचे ज्ञान’ या विषयावर २० ते २४ ऑक्टोबर दरम्यान न्यू कॉन्फरन्स हॉल येथे पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलन व मंगलचरणयाद्वारे करण्यात आले. यावेळी मंचावर वाराणसी येथील डॉ. हरेराम त्रिपाठी, दिल्ली येथील एस.आर.आयचे अध्यक्ष जे.एम. दवे, प्राचार्य डॉ. संजय भारंबे, तत्वज्ञान विभागप्रमुख प्रा.डॉ. रजनी सिन्हा, सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. देवेंद्र इंगळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना सिन्हा म्हणाले की, भारतीय संस्कृतीत दर्शनशास्त्र, वेद दर्शन, उपनिषीदे हे जीवनाचे मार्गदर्शक आहेत. कारण जीवन जगण्याचे आणि त्याला खोलवर जाणून घेण्यासाठी याचा आपल्याला अधिक उपयोग झाला आहे, यात तिळमात्र शंका नाही. असेही मत त्यांनी मांडले. वक्ते जे.एम. दवे यांनी आपल्या मनोगतात भारतीय संस्कृती आणि दैनंदिन जीवनात भगवतगीतेचे महत्व, कर्म, भक्ती, ज्ञान, यासोबत रामायण, महाभारत या महान काव्यामुळे कुटुंबात निर्मळ संस्कार हे आपसूकच होत आहेत. यामुळे आजच्या पिढीला या काव्याचे महत्व पटवून देणे तितकेच गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. रजनी सिन्हा यांनी केले व आभार प्रा.डॉ. देवानंद सोनार यांनी मानले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज