जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । मु.जे.महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विज्ञान रैलीत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मान्यवर प्राचार्य डॉ.रा.भ.वाघुळदे, डी.एन.सी.वी.पी. शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय यांनी न्यानोटेक्नालाजी विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना अन्न भेसळ चाचणी प्रात्यक्षिके सादरीकरण करून दाखवण्यात आले. तसेच पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्राचार्य व्ही.एस.झोपे, पी.जी.सी.एस.टी.आर. कॉलेज, जळगाव हे परिक्षक म्हणून लाभले. कार्यक्रमासाठी प्राचार्य सं. ना. भारंबे व प्रा. र. म. राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे नियोजनात प्रा.सोनल उपलपवार, प्रा.डॉ.जयश्री भिरूड, प्रा.डॉ.वाय.बी.मोरे, प्रा.डॉ.आर.डी.पाटील, डॉ.म.अ.पांडे, प्रा.डॉ.वसीम शेख, प्रा.डॉ.राहुल महीरे, प्रा.संदीप पाडवी, प्रा.डी.आर.नाइक, प्रा.आरजु काझी, प्रा. ऐश्वर्या परदेशी यांचे सहकार्य लाभले.