शिवसेनेतली गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर ; एरंडोल येथे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस गटागटांमध्ये साजरा

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२१ । एरंडोल येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख मा.ना.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार चिमणराव पाटील यांच्या निधीतून एरंडोल शहरातील गांधीपुरा, विखरण रोड परिसर व म्हसावद रोडवरील नवीन वसाहतींमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील म्हणाले की सत्ता व पदाचा उपयोग समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा आपण नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो.जनतेचे आशीर्वाद व कार्यकर्त्यांचे प्रेम याच शिदोरीवर गेल्या 40 वर्षात आपण सर्व संकटांवर मात करून पुढे जात आहोत. गांधीपुरा भागात स्वातंत्र्यानंतर प्रथमच आमदार निधीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे करताना आपल्याला विशेष आनंद होत आहे.

जनतेनेही काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं तसेच आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या हाती सत्ता दिल्यास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून एरंडोल शहरासाठी सुमारे चारशे कोटींचा विकास निधी उपलब्ध करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.

याप्रसंगी पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष हिम्मत पाटील, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,जि. प.सदस्य नानाभाऊ महाजन, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन, नगरसेवक कुणाल महाजन, नगरसेविका आरती महाजन, नगरसेविका दर्शना ठाकूर, नगरसेविका प्रतिभा पाटील, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी,  युवासेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील, युवासेनेचे शहरप्रमुख अतुल महाजन, उपतालुकाप्रमुख संजय पाटील, उपतालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, माजी नगरसेवक सुभाष मराठे, माजी नगरसेवक सुनील चौधरी, नगरसेवक नितीन बिर्ला, चिंतामण पाटील, विजयकुमार ठाकुर, राजेंद्र ठाकूर, सुनील मराठे,परेश बिर्ला,अमोल भावसार,चंदू जोहरी, कुणाल पाटील, कृष्णा ओतारी,देवेन पाटील, नितीन बोरसे, प्रवराज पाटील, गोविंद बिर्ला, ऋषी शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते.

तर दुसऱ्या एका कार्यक्रमात

महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथील  शिवसेना कार्यालया मध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटिल यांच्या अध्यक्षते खाली जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने यांच्या तर्फे छत्री वाटापचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जिल्हाप्रमुख हर्षल माने यानी मनोगत व्यक्त केले.या वेळी कार्यक्रमामध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,उप तालुका प्रमुख रविंद्र चौधरी,उमार्दे येथील उपसरपंच संदीप पाटिल, रवींद्र जाधव, सुनील माणुधने, संजय महाजन, प्रसाद दंडवते, रूपेश माळी,अरुण महाजन,संदीप पाटिल,गजानान महाजन,गोपाल महाजन, महेश महाजन,भिका चौधरी,विनोद मराठे, युवासेना,शिवसेना,शाखा प्रमुख, गटप्रमुख मोठ्या संख्येने शिवसैनिक बांधव उपस्थित होते. कार्यक्रम चे सूत्रसंचलन प्रमोद महाजन यानी केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar