fbpx

मोदी सरकारला ७ वर्ष झाल्याबद्दल पाचोरा तालुक्यात विविध उपक्रम

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२१ । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाची यशस्वी सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुक्याच्या वतीने सेवा हेच संघटन हे ब्रीद जोपासत भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात  लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना काळात फ्रन्ट-लाइन वर्कर म्हणून काम करणारे सर्व शासकीय डॉक्टर्स, नर्सेस, कंपाउंडर, रुग्णवाहिका चालक, परीचालक गावातील आशा सेविका,तसेच शासकीय रूग्णालयातील साफ-सफाई करणारे  कर्मचारी या सर्वांना गावा-गावात जाऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी नगरदेवळा व लोहटार  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह परिसरातील गावात भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे व  सभापती सुभाष पाटील यांनी पाचोरा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी समाधान वाघ यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना व आशा सेविकांना सन्मान पत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.तसेच यावेळी लसीकरणासाठी उपस्थित नागरिकांना चहा व बिस्कीट वाटप करण्यात आले.

तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य मधुकर काटे  यांनी देखील पिंपळगाव येथील ग्रामीण रुग्णालयातील व परिसरातील गावांमध्ये जाऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना व आशा सेविकांना सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. सभापती बन्सीलाल पाटील यांनी देखील नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रासह परिसरातील गावा-गावांत जाऊन आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.

यासोबतच भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी यांनी पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय व पंचमुखी हनुमान चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसह शहरातील आशा सेविकांना सन्मानित केले.व लसीकरणासाठी उपस्थित असणाऱ्या नागरिकांना चहा आणि बिस्कीट चे वाटप केले.यासह संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावातील आशा सेविकांना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गावा-गावांत जाऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले की तालुक्यातील सर्व डॉक्टर नर्सेस व इतर आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका हे कोरोना काळात जे काम करत आहेत. त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कोरोनाच्या या भयावह परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना देखील रुग्णाजवळ जाता येत नाही.परंतु सर्व आरोग्य कर्मचारी हे आपल्या जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडत असतात. व आपल्या परीवारा पासुन दुर राहून ते इतरांच्या परिवाराची काळजी घेतली आहेत.त्यामुळे त्यांचे ऋण फेडणे तर शक्यच नाही.परंतु एक सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करून त्यांचे सर्वांचे आभार मानतो. असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.

या प्रसंगी याप्रसंगी भाजपा तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, विधानसभा क्षेत्र प्रमुख हिम्मतसिंग निकुंभ तालुका उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी, नगरदेवळा येथील सरपंच प्रतिक्षा काटकर, उपसरपंच विलास भामरे, पिंपळगाव येथील डॉ.शांतीलाल तेली, भाजपा नगरदेवळा शहराध्यक्ष नामदेव पाटील, भाजपा पिंपळगाव शहराध्यक्ष विनोद पाटील, दिपक माने,राजेश संचेती,रमेश शामनानी, परेश पाटील, भैया ठाकूर, विरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, गजानन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज