fbpx

खड्यांमुळे नागरिक बेजार ; राष्ट्रवादीने केले अनोख्ये आंदोलन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ ऑगस्ट २०२१ । वरणगाव शहरातील खड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहे. दरम्यान, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात बेशर्मी वृक्षाची लागवड करून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज सोमवारी अनोख्ये पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला.

वरणगाव शहरातील बस स्टॉप ते स्टेशन रोड या रस्त्याचे तीन महिन्यापूर्वी स्थानिक आमदार निधीतून काम करण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत याचा निषेध करण्यासाठी वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये बेशरमीच्या वृक्षाचे आज वृक्षारोपण करून ठेकेदारांनी केलेल्या खराब कामाचा निषेध व्यक्त केला आहे, तात्काळ रस्त्याचे काम करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने याठिकाणी करण्यात आली आहे. यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ठेकेदाराच्या या बेशरमी कामाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वरणगाव शहरतर्फे बेशरमीच्या झाडाचे बस स्टँड चौकात वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दिपक मराठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय. आर. पाटील, ओबीसी विभाग तालुकाध्यक्ष मनोज कोलते, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष पप्पू जकातदार, सुधाकर जावळे, महिला शहराध्यक्ष रंजना पाटील, माजी नगरसेवक रवींद्र सोनावणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज