वरणगाव पालिकेला मिळाला नवीन अग्निशमन बंब

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । वरणगाव पालिकेला जिल्हा वार्षिक योजनेच्या अग्निशमन सेवा व आणीबाणी सेवा बळकटीकरण योजनेतून ५० लाख रूपये किमतीचा अद्ययावत अग्निशमन बंब मिळाला. जळगाव येथील कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत पालिकेला बंबाचे वितरण करण्यात आले.

वरणगावात पालिका स्थापन झाल्यापासून अग्निशमन बंब नव्हता. त्यासाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी होती. त्यानुसार मिळालेला बंब आपत्कालीन स्थितीत आग विझवण्यासाठी उपयोगी पडेल. दरम्यान, वरणगावात माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख आखलाक शेख युसुफ, मिलिंद मेढे, मिलिंद भैसे, हितेश चौधरी यांनी बंबाची पाहणी केली.

यांची उपस्थिती होती 

कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, डी.एच.पाटील, प्रांताधिकारी तथा वरणगाव पालिकेचे प्रशासक रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी समीर शेख, अग्निशमन पथकाचे प्रमुख दौलत गुट्टे, शाखा अभियंता गणेश ताठे उपस्थित होते.

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज