भुसावळकरांनो लस घ्यायला जाताय : ‘या’ नऊ केंद्रांवर आज लसीकरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२१ । भुसावळ शहरात आज शनिवारी (दि.२३) नऊ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या सर्व ठिकाणी कोविशील्ड आणि केवळ आदर्श हायस्कूल केंद्रांवर कोव्हॅक्सिनचे ७० डोस उपलब्ध असतील. शहरातील सर्व केंद्र मिळून एकूण १७७० डोस उपलब्ध झाले आहेत. त्यातून कोविशील्डचा पहिला व दुसरा, तर कोव्हॅक्सिनचा फक्त दुसरा डोस मिळेल.

या केंद्रावर लसीकरण सुरु

शहरातील वरणगाव रोड, बद्री प्लॉट, खडका रोड, महात्मा फुले आराेग्य केंद्र, पालिकेचा मुख्य दवाखाना या केंद्रांवर कोविशील्डचे प्रत्येकी २०० डोस असतील. त्यातून प्रत्येकी १०० जणांना पहिला व दुसरा डोस घेता येईल. राम मंदिर वॉर्डातील ओसवाल पंचायती वाडा व आहिल्यादेवी कन्या शाळा या केंद्रात कोविशील्डचे १५० डोस आहेत. त्यातून १०० जणांना पहिला, तर ५० जणांना दुसरा डोस मिळेल. नवशक्ती लसीकरण केंद्र आणि आदर्श हायस्कूल केंद्रात कोविशील्डच्या २०० लस आहेत. तेथेही प्रत्येकी १०० जणांना पहिला व दुसरा डोस घेता येईल.

आदर्श हायस्कूल केंद्रावर कोव्हॅक्सिनच्या ७० लस उपलब्ध असून त्यांचा वापर केवळ दुसऱ्या डोससाठी होईल. दरम्यान, पालिकेकडून आगामी काळात लस न घेणाऱ्या दुकानदार, विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. यामुळे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांना करण्यात अाले अाहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज