fbpx

यावल तालुक्यातील आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरवात

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । कोरोनाचा ग्रामीण क्षेत्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंत्रणा अधिक सर्तक व सज्ज झाली असून जिल्ह्यास यावल तालुक्यात आज लस उपलब्ध झाल्याने पुन्हा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरवात झाली आहे.

दरम्यान काळात काही लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद करण्यात आले होते त्यामुळे अनेक नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. परंतु आज यावल तालुक्यात लस उपलब्ध झाल्याने तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रावर आज लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील फक्त ग्रामीण रुग्णालय यावल व भलोद प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी १८ वर्षा ते ४४ वर्षे पूर्ण वयोगटातील व्यक्तीसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.  या तालुक्यातील इतर सर्व लसीकरण (आरोग्य) केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगर कठोरा येथे ४५ वर्षा वरील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ प्राजेक्ता चैव्हान   यांच्या मार्गदर्शनाखाली येत आहे आरोग्य साहेक नितीन जगताप आरोग्य सेवक चेतन कुरकुरे आरोग्य सेविका लता चौधरी लसीकरण दुसरा ( सेकंड) डोस असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. ३०टक्के लसीकरण हे प्रथम डोस असणा-या नागरिकांचे करण्यात आले असे वैद्यकीय अधिकारी डॉ प्राजक्ता चौव्हान यांनी सांगितले डोंगर कठोरा व तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रावर आजपासून कोरोना लसीकरण कार्यक्रमास सुरूवात झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज