fbpx

पाचोरा शहरात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु ; आ. किशोर पाटलांच्या हस्ते उदघाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । पाचोरा शहारात आज 8 मेपासून शहरातील बाहेरपुरा भागातील प्रथम आरोग्य केंद्रात 18 ते 44 वर्षापर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आमदार किशोर अप्पा पाटील याच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

शहारात वाढती रुग्ण संख्या आणि सर्वाधिक बाहेर जाऊन काम करणारा वर्ग म्हणजे 18 वर्षावरील नागरिक याचे लसीकरण आज पाचोरा येथे सुरु झाले पहिल्याच दिवशी युवा वर्गाने लसीकरनासाठी चांगलाच उत्साह दाखवला. तसेच आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ यांनी दिलेलेल्या प्रतिक्रियेत पाचोरा तालुक्यात सध्याची कोरोना परिस्थिती  ठीक आहे. ऍक्टिव्हरुग्ण 451 च्याजवळपास आहे व मागे ऑक्सिजन अभावी दोन रुग्ण दगावले यात काही तथ्य नव्हते उशिरा उपचारला आणल्या मुळे ती दगावली गेली ऑक्सिजन पुरेस्या प्रमाणात आहे. त्या बद्दल काळजी करण्याची गरज नाही. पाचोरा आरोग्य विभाग चांगल्या प्रमाणात लसीकरण करत आहे. कोरोना रुग्णसाठी चांगल्या उपयोजना केल्या आहेत.

mi advt

याप्रसंगी आमदार किशोर अप्पा पाटील, लोकनियुक्त नगरसेवक छोटू गोहील पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ आरोग्य सेवक /सेविका जयंत जाधव, आकाश ठाकूर, भारती पाटील, जिजा वाडेकर, वनिता जाधव सोबत आदि.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज