fbpx

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 61 हजार नागरीकांचे लसीकरण

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असतानाच नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 61 हजार 201 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 18 हजार 272 नागरीकांना दुसरा डोस दिल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 16 जानेवारी, 2021 रोजी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला होता. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या सत्रात आरोग्य सेवकांचे लसीकरण सुरु केले. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 45 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते. 1 एप्रिलपासून जिल्ह्यातील 45 वर्षावरील सर्व नागरीकांचे लसीकरण सुरु करण्यात आले असून जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही खाजगी रुग्णालयातूनही नागरीकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन नागरीकही स्वयंस्फुर्तीने मोठ्या प्रमाणात लस घेण्यासाठी पुढे येत आहे.

कोरोना लसीकरणास नागरीकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनकडे मोठ्या प्रमाणात लसीची मागणी नोंदविली असून नागरीकांच्या मागणीनुसार लसीकरण केंद्रही वाढविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 61 हजार 201 नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस तर 18 हजार 272 नागरीकांना दुसरा डोस घेतला आहे. पैकी सर्वाधिक 52 हजार 154 नागरीकांचे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे तर 26 हजार 932 नागरीकांचे लसीकरण प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुविधा असलेल्या खाजगी रुग्णालयामार्फत करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज