fbpx

बोदवड तालुक्यात पार पडला लसीकरण मेळावा

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२१ । रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन कोरोना मुक्त रावेर लोकसभा क्षेत्र’ अंतर्गत बोदवड तालुक्यातील जामठी, येवती, लोणवडी व धोंडखेडा येथे लसीकरण मेळावा घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला रावेर लोकसभा क्षेत्रात गती देण्यासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने ‘मिशन कोरोना मुक्त रावेर लोकसभा क्षेत्र’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बोदवड तालुक्यातील जामठी, येवती, लोणवडी व धोंडखेडा येथे लसीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी खा. खडसे यांनी लसीकरण केंद्रांना भेटी देऊन ग्रामस्थ व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून चर्चा केली. तसेच कोविड लस विषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले. यावेळी भाजयुमो तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, तालुका सरचिटणीस उमवंश पाटील, तालुका उपाध्यक्ष भागवत चौधरी, संतोष चौधरी, सुनिल माळी, राजु जैस्वाल, भागवत पाटील, विक्रम पाटील यांसह आरोग्य सेविका, डॉक्टर व स्थानिक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज