जिल्ह्यात आजपासून १५ ते १८ वर्षे या वयोगटाचे लसीकरण ; लसीकरणासाठी जाताना ‘हे’ घेऊन जा, अन्यथा..

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ ।जळगाव जिल्ह्यात या वयोगटातील सव्वादोन लाख लाभार्थी आहेत. त्यात शहराचा आकडा 24 हजारांच्या पुढे आहे. जिल्ह्यात 20 तर शहरात चार केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. सोमवार व मंगळवार अशा दोन दिवसांची लसीकरणाची नोंदणी 100 टक्के पूर्ण झाली. मोहीमेला शहरात उत्सवाचे स्वरुप दिले जाणार आहे. त्यासाठी शाहू महाराज रुग्णालयातील केंद्रावर ज्या मुलांचे पालक कोरोनाने दगावले आहेत किंवा जे निराधार असतील अशांचे लसीकरण जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत होईल.

मेसेजसाठी नोंदणी केलेला मोबाइलही सोबत आणावा

  • लसीकरणासाठी कोणती कागदपत्रे लाभार्थ्यांनी सोबत आणायला हवी?
  • नोंदणी केलेल्यांनी सोबत आधारकार्ड आणणे आवश्यक आहे. समजा ते नसल्यास रेशन कार्डचा पर्याय चालु शकेल. पॅन कार्ड, पासपोर्टही चालेल. ज्या मोबाईलवर मेसेज व प्रमाण पत्र येईल तो सोबत आणावा.
  • नोंदणी केली नसेल तरी लसीकरण केंद्रावर मुलांना लस मिळणार का?
  • ऑनलाइन नोंदणी केलेल्यांना प्राधान्य क्रमाने लस दिली जाईल. परंतु, ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली नसेल त्यांना केंद्रांवर आल्यानंतर लस घेता येईल. कुणीही लस घेतल्याशिवाय परत जावू नये असा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
  • पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस या वयोगटासाठी किती दिवसांनी?
  • 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसांनी दिला जाईल. लसीकरण पूर्णत: सुरक्षित आहे. ही लस घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे

जळगाव शहरात या केंद्रावर मिळणार लस
जळगाव शहरात शाहू महाराज रुग्णालय, कांताई नेत्रालय, चेतनदास मेहता रुग्णालय, डी. बी. जैन हॉस्पिटल शिवाजीनगर येथे 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस मिळेल.

केंद्रावरही होईल नोंदणी
कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाइल नंबरद्वारे 1 जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरु झाली आहे. लसीकरणाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचा जन्म 2007 किंवा तत्पूर्वी झालेला हवा. केंद्रावरही नोंदणी करता येईल.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -