”जळगाव लाईव्ह”ची दखल ; सावदा शहरात लसीकरण सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२१ । सावदा येथे मागील महिन्यात “कोव्हेक्सीन” ही लस ग्रामीण रुग्णालयाय उपलब्ध झाल्याने येथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, काही दिवसापूर्वी हे लसीकरण लसी उपलब्ध नसल्याने थांबले होते यामुळे पहिल्या व दुसऱ्या डोस साठी नागरिक प्रतीक्षा करीत होते याबाबत जळगाव लाईव्ह ने वृत्त प्रसिध्द केले होते 

तसेच याबाबत आ. चंद्रकांत पाटील यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी देखील येथे त्वरित लस पुरवठा होईल असे सांगितले होते, दरम्यान यावृतांची दखल घेऊन सावदा येथे लस उपलब्ध होऊन लसीकरण सुरू झाले. यास नागरिकांचा प्रतिसाद लाभत असून लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे, तसेच दुसरा डोस घेणारे नागरिकांची चिंता देखील दूर झाली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज