fbpx

जळगावात आज लसीकरण बंद ; उद्या राहणार नियमित सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या साडेचार महिन्यांपासून निरंतर लसीकरण सुरू आहे. सुटीच्या दिवशीही केंद्र सुरू ठेवले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा वेग मंदावला आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत. तर उद्या सोमवारी या सर्व केंद्रांवर नियमित लसीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात शनिवारी ४५ वर्षांवरील ८६५७ जणांनी लसीकरण करून घेतले.

 यात ७ हजार २२ जणांनी लसीचा पहिला डोस तर १६१० जणांनी दुसरा डोस घेतला. आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ४९ हजार ४२८ जणांनी पहिला डोस घेतला तर १ लाख ३२ हजार ६५४ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. जिल्ह्यात ५५ केंद्रांवर कोविशील्ड १३ हजार ९८० कोविशील्ड लस तर ५४० कोव्हॅक्सीन लसीचे डोस शिल्लक आहेत. 

शहरात सध्या कोविशील्ड लस शिल्लक आहे. कोव्हॅक्सीनचे डोस संपलेले आहेत. नवीन साठा आल्यावर हा डोस दिला जाणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज