fbpx

जळगावकरांनो कोविड लस घ्यायला जाताय? आधी वाचा आज लसीकरण बंद की सुरु?

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ । जळगाव जिल्हाभरात कोविड प्रतिबंधक लसींचा साठा संपला आहे. त्यामुळे जळगाव शहरातील लसीकरणाचे सर्वच केंद्र बंद राहणार आहे.  गुरूवारी सायंकाळी जिल्ह्याला लस प्राप्त होण्याची शक्यता असून शुक्रवारी केंद्र उडघतील.

शहरातील महापालिकेची सर्व केंद्र बुधवारी बंद राहणार असल्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी कळविले आहे. जिल्ह्यात ३५० वर केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र, त्यातुलनेत लसींचा साठा अगदीच मुबलक उपलब्ध होत आहेत. 

त्यातच जो साठा येत आहे. तो दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे पहिला डोस सुरू झाल्यानंतर केंद्रांवर पुन्हा गर्दी वाढणार आहे. दरम्यान, सोमवारी महापालिकेचे केंद्र सुरू होते, मात्र, लस नसल्याने ते मंगळवारी बंद ठेवण्यात आले होते. बुधवारी पुन्हा लस नसल्याने शिवाय गुरूवारीही मिळण्याची शक्यता कमीच असल्याने लसीकरणासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt