एरंडोल शहरात हर घर दस्तक अंतर्गत लसीकरण मोहीमेला सुरुवात

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल शहरात प्रभागानुसार “कोरोना लस आपल्या दारी” कोविड मोहीमेला सुरुवात झाली असून, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसर, जोहरी गल्ली परिसर तर संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत पांडव वाडा, लक्ष्मी नगर पद्मालय नगर, गुरुकुल कॉलनी या भागात लसीकरणाचे काम करण्यात आले.

दरम्यान सदर ठिकाणी प्रांताधिकारी विनय गोसावी, ग्रामीण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिरोज शेख, सामाजिक कार्यकर्ते आनंद  दाभाडे, आनंदा चौधरी यांच्यासह मान्यवरांनी भेट देऊन आढावा घेतला.

यांनी केले लसीकरण 

ग्रामीण रुग्णालयाचे सरला गढरी, रीना बोरोले, केशव ठाकूर, नगरपालिकेचे तुषार शिंपी या पथकाने कोरोना लसीकरण केले.

दरम्यान, कोविड साथरोगाच्या तिसऱ्या लाटेच्या वर्तवलेल्या शक्यतेच्या अनुषंगाने कोविड लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने तात्काळ वाढवणे आवश्यक आहे. नागरी क्षेत्रात हर घर दस्तक मोहिमेची अंमलबजावणी करणे व त्याच्या अंतर्गत लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढ होण्याच्या दृष्टीने नियोजन करून तात्काळ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने सदर मोहिमेअंतर्गत प्रभाग निहाय लसीकरण करण्यात येत आहे.

नागरिकांना लस घेण्याचे आवाहन 

सदर लसीकरण वहिनी साठे प्रांताधिकारी विनय गोसावी, एरंडोल नगर परिषद नगराध्यक्ष रमेश सिंग परदेशी, मुख्याधिकारी विकास नावळे, हितेश जोगी कार्यालयीन प्रमुख व नगरपरिषद कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय एरंडोल डॉक्टर कैलास पाटील व ग्रामीण  डॉक्टर फिरोज शेख, रुग्णालयातील नर्स, परिचारिका व कर्मचारी महसूल विभागीय एरंडोल यांच्या संयुक्त रित्या मोहीम राबवली जात असून, नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबीर यशस्वीतेसाठी जय श्रीराम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -