जळगावकरांनो लस घ्यायला जाताय? आज शहरातील ‘या’ केंद्रांवर लसीकरण सुरु

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । जळगाव जिल्ह्याला शनिवारी १ लाख ६० हजार कोविशील्ड लसीचे डोस प्राप्त झाल्याने आज सोमवारी सर्व केंद्र सुरू राहणार आहेत. आतापर्यंत शहरात २,३०,४८९ जणांनी लसीचा पहिला तर १,२६,५८१ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

या केंद्रावर राहणार लसीकरण सुरु?

यात शाहू महाराज रुग्णालय, डी.बी. जैन रुग्णालय, कांताई नेत्रालय, भागवत खंडू सोनवणे विद्यालय शनिपेठ, मुलतानी हॉस्पिटल, नानीबाई रुग्णालय, मनपा शाळा क्रमांक ४८ पिंप्राळा, कोल्हे विद्यालय व रेडक्रॉस येथे कोविशील्ड लस मिळेल तर चेतनदास मेहता रुग्णालय व रोटरी क्लब येथे कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत 21 लाख 29 हजार 121 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 16 लाख 09 हजार 601 जणांना पहिला डोस तर 5 लाख 19 हजार 520 जणांना दुसरा डोस देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 16 लाख 09 हजार 601 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 5 लाख 19 हजार 520 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 21 लाख 29 हजार 121 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 9 लाख 13 हजार 37 तर ग्रामीण भागातील 12 लाख 16 हजार 84 नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज रविवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज