fbpx

उत्राण येथे हातभट्टी दारू तयार करणाऱ्या विक्रेत्यांच्या भट्ट्या उध्वस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जुलै २०२१ । कासोदा पो.स्टेशन अंतर्गत उत्राण परिसरात आज शुक्रवारी १० ते १२ हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत.  पोलिसांच्या या कारवाईमुळे हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

याबाबत असे की, आज कासोदा पो.स्टेशन चे सहा.पो. निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हॅड. काॅ. नंदू पाटील, शिवाजी पाटील, नितीन मोरे, जितेश पाटील यांनी उत्राण परिसरातील १० ते १२ हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्या उध्वस्त करून अंदाजे दहा हजार सहाशे किमतीच्या प्लास्टिक ड्रम, दारू तयार करण्याचे रसायन व इतर साहित्य नष्ट केले. या कारवाईमुळे गावातील लोकांनी समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज