प्रवाशांनो लक्ष द्या : उद्या अप-डाऊन वरील भुसावळ-इगतपुरी मेमू गाडी रद्द

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. कारण उद्या दि. १२ रोजी भादली जळगांव दरम्यान चौथ्या लाईनच्या कामामुळे अप-डाऊन वरील भुसावळ-इगपुरी मेमू गाडी रद्द करण्यात आलेली आहे.

कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर गेल्या मार्च २०२० पासून भुसावळ-देवळाली शटल बंद करण्यात आली. यामुळे चाकरमान्यांसह सर्वसामान्यांना प्रवाशांची गैरसोय होत होती. दरम्यान, आता पॅसेंजर ऐजवजी भुसावळ इगतपुरी मेमू गाडी चालवण्याचा निर्णय भुसावळ(Bhusawal) रेल्वे प्रशासनाने नुकताच घेतला होता. भुसावळ-इगतपुरी (Igatpuri) मेमू (Memu) ट्रेन १० जानेवारीपासून सुरु झाली आहे. यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला.

दरम्यान, दोन दिवस धावल्यानंतर 11119/11120 या क्रमांकाची भुसावळ – इगतपुरी मेमू गाडी उद्या दि. १२ जानेवारीला रद्द करण्यात आलेली आहे. भादली जळगांव दरम्यान चौथ्या लाईनच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -