लेवा पाटीदार युवक महासंघाच्या मेहरुण शाखेच्या फलकाचे अनावरण

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मेहरुण येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या शाखेचे फलक अनावरण रविवार दि.३१ रोजी बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष तथा प्रथम महापौर आशा कोल्हे यांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर जयश्री महाजन ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, केंद्रीय उपाध्यक्ष राजेश चौधरी, प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप रोटे, निखिल रडे, महानगर अध्यक्ष अतुल महाजन, महानगर उपाध्यक्ष योगेश इंगळे, महानगर सचिव सागर महाजन, बहिणाबाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष हर्षा बोरोले, महानगराध्यक्ष साधना लोखंडे, ललित धांडे, निरंजन पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर मेहरुण शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात शाखाध्यक्षपदी दीपक धांडे, उपाध्यक्षपदी निरज पाटील, सचिवपदी निखिल पाटील, खजिनदारपदी लोकेश महाजन, कार्यकारी सदस्यपदी चेतन पाटील, निलेश पाटील, दीपक अत्तरदे, हितु पाटील, संकेत महाजन, स्वप्निल धांडे, चेतन चौधरी आदींची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मेहरुण येथुन लेवा युवा संवाद अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश पाटील यांनी युवकांशी संवाद साधून सामाजिक, शैक्षणिक, बेरोजगारी यांसह शेतकरी युवकांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्यांवर संघटनेकडुन योग्य उपाय योजना केल्या जातील असे आश्वासन दिले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज