fbpx

जळगावात अनेक ठिकाणी अवकाळीचा दणका, शेतकऱ्यांचे नुकसान

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ । जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात आज सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली मात्र, उकाड्यापासून या पावसाने काहीसा गारवा मिळाला आहे.

धरणगावात वादळी वाऱ्यासह पाऊस

शहरात आज दुपारी वादळी वाऱ्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धातास झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून विद्युत पोलावर पडल्या. एक झाड चारचाकी वाहनावर आदळले. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.दरम्यान, काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

भडगाव परीसरातील टोणगाव शिवारात १० मिनीटे गारासह पाऊसही झाला.

पहूर येथे पाऊस

पहूर ता. जामनेर येथे  सोमवारी अचानक वातावरणात बदल झाला आणि जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात काही वेळ गारवा जाणवत होता. मात्र या पाऊसाने काही  शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt