⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | अवकाळीचा फटका : पारगाव शिवारात मका, दादर भुईसपाट‎

अवकाळीचा फटका : पारगाव शिवारात मका, दादर भुईसपाट‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । अवकाळी पावसाने खरिपात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. आता पुन्हा गेल्या चार दिवसांपासून अवकाळी सुरु असल्याने याचा फटका रब्बी हंगामातही चांगलाच बसत असल्याचे चित्र चोपडा तालुक्यातील पारगाव येथे ७‎ रोजी रात्री आलेल्या अवकाळी‎ पावसामुळे शेतकऱ्यांचे माेठ्या‎ प्रमाणात नुकसान झाले आहे. यात‎ उभे असलेला मका, दादर व अन्य‎ पिकांचे माेठे नुकसान झाले.‎ गेल्या चार वर्षात अवकाळी‎ पावसाने परिसरातील शेतकऱ्यांना‎ ‎ हैरान करुन सोडले आहे.

यात‎ पारगाव, मितावली, धानोरा,‎ कमळगाव, पुनगाव आदी शिवारात‎ माेठ्या प्रमाणात नुकसात होत‎ असते. दरम्यान, ७ रोजी रात्री ७‎ वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी‎ पावसामुळे पारगाव शिवारातील‎ उभा असलेला मका, दादर ही पिके‎ आडवी झाली अाहे. यामुळे सुरेश‎ किसन पाटील, भीमराव नामदेव‎ ‎ पाटील, सुभाष रामदास पाटील,‎ अशोक महारू पाटील, अरुण‎ सुकलाल पाटील, उत्तम दशरथ‎ पाटील, विजय रामराव पाटील‎ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे‎ नुकसान झाले. दरम्यान, अवकाळी‎ पावसामुळे झालेल्या नुकसानीचा‎ पंचनामा करुन भरपाई मिळावी,‎ अशी अपेक्षा परिसरातील‎ शेतकऱ्यांनी केली आहे.‎

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.