fbpx

पारोळ्यात अवकाळी पावसाची हजेरी

पारोळा शहरात दुपारी साडेतीन च्या सुमारास अचानक सोसाट्यच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाला हजेरी लावली. मागील गेल्या काही दिवसापासून उकाळ्यामुळे नागरिक हैरान झालेल्या पारोळाकरांना अचानक आलेल्या अवकाळी पावसाने थोडासा गारवा मिळाला आहे.

पावसामुळे अनेकांची तारांबड उडाली तर नेहमी प्रमाणे वार्याला सुरुवात होताच लाईट गुल झाली बाहेर पाऊस तर घरा मध्ये उकाडा असल्याने नागरिक हैरान झाले,या वादळ वार्याचा जास्त फटका हा तालुक्यातील महाळपुर बहादरपुर सह इतर गांवाना बसला या वादळ वार्या मुळे या भागातील अनेक वृक्ष उनमळुन पडेले असल्या ची माहीती समोर येत आहे, तर अार्ध्या तासाच्या पाऊस वाऱ्यानंतर उकाड्या ने नागरिक हैरान झाले.

तर अधुन मधुन विजांसह गडगडाट ही होत होता तर दुसरी कडे वार्या चा वेग ही मंदावला होता,अरबी समुद्रात उठलेल्या वादळा चा हा परिणाम असल्याचे काही जाणकार मंडळी सांगत होते.

दरम्यान, या अवकाळी पावसामुळे पारोळा तालुक्यातील बहादरपुर मंडळातील महाळपुर येथील अनेक घरांची पत्रे उडाली तर परिसरातील लिंबुची मोठमोठी झाडे वादळी पावसाने कोलमळल्याने बहरलेल्या लिंबु जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांचे  लाखोचे नुकसान झाले असुन शासनाने पंचनामा करित मदत करावी अशी मागणी महाळपुर येथील सरपंच सुधाकर पाटील यांनी केली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज