पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य ; पतीस तीन दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । यावल शहरात 23 वर्षीय विवाहितेवर पतीकडून दारूच्या नशेत घरी येवून पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी  येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी पतीस अटक करण्यात आली असून, त्यास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सविस्तर असे की, यावल शहरातील एका परीसरात राहणार्‍या 23 वर्षीय विवाहिता आपल्या पतीसह राहते. लग्नाच्या आठ दिवसानंतर पतीला दारूचे व्यसन जडले. दारूच्या नशेत घरी येवून पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. विवाहितेने लव्ह मॅरेज केल्याने लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून, आता दिवाळीसाठी माहेरहून कार, रोख रक्कम व सोन्याची अंगठी आणावी यासाठी विवाहितेचा छळ केला. अत्याचार सहन न झाल्याने त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठलत पतीविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गर्शदनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अजमल खान पठाण, पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज