खरोखर बाळासाहेब ठाकरेंच्या पोटचे सुपुत्र असाल तर अध्यादेश काढा : खा.उन्मेष पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२१ । कोरोना काळात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईत सेवा दिली. तुमचा जीव वाचवायला एसटी तुम्हाला गोड वाटली आणि आज बोनस देताना जो न्याय बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिला तोच एसटीलादिला असता तर तुमच्यातील माणूस जिवंत असल्याचे आम्हाला वाटले असते. स्वतःला स्व.बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र म्हणून घेता जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. अहो, पालकमंत्री तुम्ही कव्वाली म्हणता, पैसे उडवता. अरे कुठेतरी वाटली पाहिजे. माझ्या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवत नाही. नाही सोडवला तर मी राजीनामा देईल असे म्हटले पाहिजे. मंत्रिमंडळात मांडले पाहिजे, असा टोला खा.उन्मेष पाटील यांनी लगावला आहे.

विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील रविवारपासून संप पुकारला आहे. चाळीसगाव येथे आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी खा.उन्मेष पाटील यांनी भेट दिली तेव्हा ते बोलत होते. जळगाव जिल्ह्यातून पुणेसाठी अनेक ट्रॅव्हल्स, खाजगी वाहने जातात पण चाळीसगाव डेपोतुन एक एसटी जात नाही. तुम्हाला खाजगी लोकांना पोसायचे आहे कि एसटी वाढवायची आहे. मुख्यमंत्री तुम्ही परिवहन मंत्री, अर्थमंत्र्यांना बोलावून तात्काळ अध्यादेश काढा. तुम्ही खरोखर बाळासाहेब ठाकरेंच्या पोटचे सुपुत्र असेल तर आजच अध्यादेश काढा, असे आव्हान खा.उन्मेष पाटील यांनी केले आहे.

खा.उन्मेष पाटील यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. आज खा.उन्मेष पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पालकमंत्री विरोधातील वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

पहा काय म्हणाले खा.उन्मेष पाटील :

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज