अज्ञात इसमाने लांबवली दुचाकी; गुन्हा दाखल

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । पोहरे ( ता. चाळीगाव ) येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात इसमाने लांबविल्याची घटना  उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर असे की, तालुक्यातील पोहरे येथील रामभाऊ उध्दव माळी (वय-३३,) यांनी घरासमोर उभी केलेली दुचाकी (क्र. एम.एच.१९ डीएफ ३७२) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. त्यावर रामभाऊ उध्दव माळी यांनी परिसरात आजपावेतो शोधाशोध केली असता १५ हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची मोटारसायकल मिळून आले नाही. म्हणून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने रामभाऊ उध्दव माळी यांनी मेहूणबारे पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

बातमी शेअर करा
- Advertisement -

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar