विद्यापीठाने हिवाळी परीक्षांच्या अर्जांसाठी दिली मुदतवाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१। कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या (हिवाळी) परीक्षांकरिता परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी काही अभ्यासक्रमांना मुदतवाढ देण्यात आली असून, ती आता ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. तर ५० रुपये विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्याची जी मुदत ३० नोव्हेंबर देण्यात आली होती, ती आता विलंब शुल्कासह ३ डिसेंबर अशी करण्यात आली आहे.

हिवाळी परीक्षांसाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा अर्ज ऑनलाईन भरून महाविद्यालयांनी परिसंस्था प्रशाळांनी परीक्षा शुल्क घेऊन विहित मुदतीत विद्यापीठात परीक्षा अर्ज सादर करावे लागणार आहे. मात्र, विविध घटकांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने व कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार परीक्षा अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या अभ्यासक्रमांना विलंब शुल्क विरहित परीक्षा अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ नोव्हेंबर देण्यात आली होती. ती आता ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. तर ५० रुपये विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्याची जी मुदत ३० नोव्हेंबर देण्यात आली होती, ती आता विलंब शुल्कासह ३ डिसेंबर अशी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीची नोंद घेऊन परीक्षा अर्ज भरावेत यापूर्वीच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्याचे परीक्षा अर्ज व शुल्क महाविद्यालय परिसंस्था, प्रशाळेत जमा केलेले आहेत.

अशा विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन इनवर्ड करून परीक्षा शुल्कासह विद्यापीठात जमा करण्याची कार्यवाही करावी करण्याच्या सूचना विद्यापीठाने केल्या आहेत. विलंब व विशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर महाविद्यालयांनी अभ्यासक्रम व वर्गनिहाय ऑनलाईन इनवर्ड रिर्पोट एकत्रित प्रिंट काढून १५ दिवसांच्या आत विद्यापीठाच्या संबंधित विद्याशाखेत जमा करावे, असे आवाहन परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. किशोर पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज