fbpx

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; साकळीचा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२१ । यावल तालुक्यातील साकळी येथील एका तरुणाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना साकळी नजीक असलेल्या भारत टोलनाका जवळ रात्री घडली आहे. रोहित अरुण कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान, धडक देऊन अज्ञात वाहन पसार झाला असून याप्रकरणी यावल पोलीसात खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली.

याबाबत असे की, यावल ते किनवगाव रोडची स्थिती अतिशय बिकट झाली असून खराब रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. काल रात्री साकळी येथील रहिवासी रोहित कोळी हा तरुण दुचाकीने (क्रमांक एमएच.१४-जे एन.२६८५) साकळी येथून किनगावकडे जात असताना त्याचा साकळी नजीक असलेल्या भारत टोलनाका समोरील वळणावर चोपड्याकडून भरधाव येणार्‍या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रोहित कोळी हा जागीच ठार झाला.

mi advt

मरण पावलेल्या रोहीत कोळीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असुन, याबाबत कैलास कोळी यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अपघाताची नोंद करण्यात आली. अपघाताची माहीती कळताच साकळी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. सदरच्या अपघातात मरण पावलेला तरूण रोहीत कोळी हा अरूण कोळी यांचा एकुलता एक मुलगा होता. या दुदैवी घटनेने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, धडक दिलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, संजय देवरे, नरेंद्र बागूल, चंद्रकांत पाटील, राहुल चौधरी यांनी सर्वत्र नाकाबंदी करून तपासणी केली. पण, उपयोग झाला नाही. मात्र, धडक देणारे वाहन शोधून काढू असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज