दुर्दैवी घटना ; गावाचा संपर्क तुटल्याने उपचारा अभावी मुलीचा मृत्यू

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | ७ सप्टेंबर २०२१ | अमळनेर तालुक्यातील शास्त्री गावात मंगळवारी सकाळी दुर्देवी घटना घडली आहे. मुसळधार पावसाने बोरी नदीला पूर आला व सातवी गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला. यामुळे गावातील एका 19 वर्षीय मुलीला वेळेवर दवाखान्यात घेऊन जाता आले नाही म्हणून उपचाराअभावी त्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घडलेल्या या सदर घटनेमुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सातवी गावातील सुरेश बिल यांची मुलगी आरुषी भिल ही गेल्या काही दिवसांपासून तापाने आजारी होती. तिला शेजारच्या गावात जाऊन दवाखान्यात हलवण्याची तयारी तिच्या आई वडिलांनी केली होती. मात्र नदीला पूर आल्याने पलीकडल्या गावात जाणे शक्य नव्हते. यावेळी ग्रामस्थांनी एका खाटेची होडी बनवून त्या मुलीला दुसऱ्या गावात पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर उशीर झाला होता ज्यात त्या तरुणीचा दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच उपचाराअभावी मृत्यू झाला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -