fbpx

अल्पवयीन मुलीला पळवुन नेल्याप्रकरणी पोलिसात तक्रार

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्युज | १२ सप्टेंबर २०२१ | एरंडोल येथे गांधीपुरा भागातील एका १७ वर्षीय मुलीला शुभम मराठे याने पळवुन नेली असावी अश्या संशयाची तक्रार मुलीच्या पित्याने एरंडोल पोलिसात दिल्यावरून दि. ११सप्टेंबर २०२१ रोजी शनीवारी राञी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत एरंडोल पोलीस सूञांकडून मिळालेल्या माहीतीनुसार येथील गांधीपुरा भागातील एक शेतकरी पिता सायंकाळी शेतातून घरी परत आल्यावर त्याची थोरली मुलगी ही गावात दुपारी क्लासला गेल्यानंतर माझ्या मैञीणीकडे जाते असे सांगून ती घरी परतली नसल्याचे आढळून आले. तीचा सर्वञ शोध घेतला असता ती  सापडली नाही.  मराठे हा तरूण माझ्या मुलीशी फोन वर बोलत आल्याने मला त्याच्यावर संशय आला असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तो माझ्या मुलीला पळवून घेऊन गेला असावा असा संशय मुलीच्या पित्याने व्यक्त केला आहे. याबाबत एरंडोल पो. स्टे. ला गुन्हा रजी.नंबर १७०/२१,भा.द.वी कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहीफळे,अकील मुजावर,प्रशांत पाटील,अनील पाटील,श्रीराम पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज