fbpx

वरखेडे बॅरेजमध्ये बुडून काका-पुतण्याचा मृत्यू

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे बॅरेजमध्ये काका-पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. हिरतसिंग जगतसिंग पवार (वय ४०) व मृनाल इंद्रसिंग पवार (१३) असे मृत काका पुतण्याचे नाव आहे.

याबाबत असे की, गिरणा नदीवर असलेल्या वरखेडे बॅरेजमध्ये काका पुतणे आंघोळीसाठी गेले होते. यावेळी पुतण्या मृनाल पवार याने खोल पाण्यात उडी मारली असता तो पाण्यात बुडायला लागला. हे पाहून काका हिरतसिंग पवार यांनी पुतण्याचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, मात्र जास्त पोहतात येत नसल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे.

दरम्यान, हिरतसिंग पवार हे एसटी महामंडळमध्ये कार्यरत होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज