शिक्षक भारती महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उज्वला देशमुख

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | २७ ऑगस्ट २०२१ | राज्यातील शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिक्षक भारती या संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी श्रीमती उज्वला देशमुख महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष नारायण वाघ यांनी उज्वला देशमुख यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला.

जळगाव येथील एका विशेष समारंभात झालेल्या या कार्यक्रमाला संघटनेतील पदाधिकारी सचिन बनसोडे, करीम सालार, भारती गाला, अश्फाक खाटीक, नूरखान, भरत शेलार, आप्पासाहेब पाटील, सुनील पाटील, विजय सोनवणे, युवराज पाटील दिलीप आर्डे, दीपक आर्डे, चंद्रकांत देशमुख, रणधीर इंगळे, के.के. पाटील ,संजय वानखेडे, अमोल वाणी , सुनिता पाटील अरुणा उदावंत, विठ्ठलराव देशमुख, अशोक महाजन सर आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शिक्षक भारती संघटना सतत संघर्ष करीत असते या संघटन कार्यात महिला आघाडीची धुरा समर्थपणे पेलण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक भरती महिला आघाडीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जळगाव येथे करण्यात आली या निवडीबद्दल श्रीमती उज्वला देशमुख महाजन यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -