fbpx
Jalgaon Live News | Latest Jalgaon News | Jalgaon News in Marathi

उदळी येथे अवैध वाळु वाहतूक करणारे ट्रेक्टर पकडले

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथून जवळच असलेल्या उदळी बु येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रेक्टर दी 11 रोजी सकाळी 7:30 वाजे दरम्यान पकडले सदर ट्रेक्टर चांगदेव येथील संजय भास्कर धनगर, रा, चांगदेव यांचे मालकीचे MH 19 AN 4654 हे रेती भरून जात असताना महसूल विभाग पथक यांनी पकडेल.

सदर ट्रेक्टर चा पंचनामा करून सावदा पोलीस स्टेशन ला जमा केले सदर पथकात सावदा मंडळ अधिकारी बी, एम, पवार, तलाठी एस, के, पाटील, तलाठी थोरगव्हाण, एम, एच, तडवी, रायपुर तलाठी श्रीहरी कांबळे, तलाठी मस्कावद ओ, एस, मटाले, उदली तलाठी मोमिन तडवी, गाते, तलाठी, प्रोपेस चोपड़े, आदि सहभागी होते, सदर कार्यवाही ने अवैध गौण खनिज वाहतूक करणारेत खळबळ उडाली असली तरी अवैध गौण वाहतूक मात्र सुरु असल्याचे दिसत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज