fbpx

डंपरची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाच्या भैरवनाथ मंदिरानजीक भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी घडली. मोहम्मद शाकीर अली जाकीर अली ( २८) आणि शमीम शाह (२६, रा.मध्य प्रदेश ) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीओपीचे बांधकाम कामगार असलेले मोहम्मद अली व शमीम शाह हे दोघेजण दुपारी कामानिमित्त कजगाव येथे निघाले होते. भडगाव रस्त्यावर वाघळी गावालगतच्या भैरवनाथ मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिली. यात या दोघे जण जागीच ठार झाले. अपघातानंतर डंपरचा चालक पसार झाला.

mi advt

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज