fbpx

वाढदिवस पडला महागात ; जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू?

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२१ । मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पाल येथे गेलेल्या जळगावच्या तरूणांमधील दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बुडालेल्या तरुणांचा रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.

याबाबत असे की, अक्षय उर्फ उज्ज्वल राजू पाटील (वय २४, रा. खेडी) या तरूणाचा वाढदिवस असल्याने खेडी, वाघ नगर व शहरातील १६ तरुण हे रावेर तालुक्यातील पाल येथे गेले होते. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास हे तरूण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. यात उज्ज्वल पाटील आणि त्याचा एक मित्र हे पाण्यात बुडाले.

यामुळे भेदरलेल्या त्याच्या मित्रांनी तातडीने ही माहिती घरच्यांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान, या तरूणांच्या नातेवाईकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून त्यांचा शोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत या दोन्ही तरूणांचा शोध घेण्यात आला असता ते मिळून आले नाहीत.

उज्ज्वल पाटील हा तरुण एका वित्तीय संस्थेत वसुलीचे काम करतो तर त्याचे वडील ऑटोमोबाईल क्षेत्रात कामाला आहेत. या घटनेनंतर काही तरुण परतीच्या मार्गाला निघाले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज