दुचाकी चोरट्यास दोन वर्षांची शिक्षा अन्..

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२१ । जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाणात मोठ्याप्रमाणात वाढले आहे. यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातारण आहे. दरम्यान, दुचाकी चाेरी प्रकरणातील आराेपीला पाचाेरा येथील न्यायालयाने २ वर्षांची कारावास त्याचप्रमाणे १२ हजार रुपये दंडाची साेमवारी शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास १ महिन्यांच्या कैदेची शिक्षेत तरतूद करण्यात आली आहे.

जामनेर तालुक्यातील जंगीपुरा येथील गणेश बाबुलाल राजपूत याच्यावर पाचोरा येथील राजेश सुरेशचंद्र कोंडवानी यांच्या फिर्यादीवरून कलम ३७९ व ३४ नुसार दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाचोरा न्यायालयात न्याय प्रविष्ट असलेल्या या दाव्यात न्यायमूर्ती एफ. के. सिद्दीकी यांनी ३ जानेवारी रोजी निकाल देत या प्रकरणातील आरोपी गणेश बाबुलाल राजपूत याला २ वर्षांची शिक्षा त्याचप्रमाणे १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठाेठावली आहे. तसेच दंड न भरल्यास १ महिन्याची कैद असा आदेश सुनावला आहे.

या प्रकरणाचा तपास तपासी अंमलदार छबुलाल नागरे यांनी पूर्ण केला आहे. तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, केस वाॅच म्हणून विकास सूर्यवंशी व राजेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले. सरकारी पक्षातर्फे अॅड. रमेश खंडू माने तर आरोपीतर्फे अॅड. चंदन राजपूत यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, या प्रकरणात आराेपीला काय शिक्षा हाेते? याकडे सर्वांचे लक्ष लागून हाेते.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -