हृदयद्रावक : रेल्वेच्या धडकेत दोन वर्षीय चिमुकली ठार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जानेवारी २०२२ । मकर संक्रांतीचा सण जिल्ह्यातील बालकांसाठी दुर्दैवी ठरला आहे. पतंगमुळे १० वर्षीय, आत्महत्येने १२ वर्षीय बालकाचा जीव गेल्यानंतर २ वर्षीय चिमुकलीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेडी शिवारात घडली आहे. दिव्या आपसिंग डावर असे चिमुकलीचे नाव आहे.

नाशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपसिंग डावर हे मुळचे भिकनगाव जि.खरगोन मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. मजूरी काम करून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करतात. रेल्वेच्या कंत्राटी कामासाठी डावर कुटुंबिय हे जळगाव तालुक्यातील खेडी शिवारात वास्तव्याला आहे.

गुरूवारी, १३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास डावर कुटूंबिय खेडी शिवारातील रेल्वे रूळाजवळ खडी टाकायचे काम करत होते. त्यांची दोन वर्षीय मुलगी दिव्या ही अचानक खेळता-खेळता रेल्वे रूळावर आली. खेळत असतांना बालिकेला धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तिला लागलीच रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र, वैदयकीय अधिकारी यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -