fbpx

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने समोरून येणार्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात बोरगाव बु! येथील अनिल ज्ञानेश्वर मराठे हा दुचाकीचालक ठार झाला.

अनिल हा दुचाकी ने एरंडोल येथे खरीप पेरण्यांसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी एरंडोल येथे येत असतांना गुरूवारी १० जून रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्या सूमारास एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर हॉटेल पांडव नजिक ही दुर्घटना घडली.

mi advt

या घटनेत ट्रकची दुचाकीस दिलेली धडक एवढी जबर होती की, ट्रकने अनिलसह दुचाकी ला काही अंतरापर्यंत फरफटत नेले.

एरंडोल पोलिस स्टेशन च्या सूञांनी दिलेली माहीती अशी की,बोरगाव बु! या. धरणगाव येथील अनिल हा एम.एच. १९ डी.आर.३९४९ क्रमांकाच्या आपल्या दुचाकीने शेतीसाठी बियाणे खरेदी करण्यासाठी जात असतांना एरंडोल कडून पारोळ्याकडे एम.पी.२० एच.बी.६०३९ क्रमांकाच्या भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने दुचाकी ला धडक दिली त्यात अनिल मराठे याच्या डोक्याला व चेहर्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला.

घटनेचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे,जितेंद्र तायडे,संतोष चौधरी,विकास खैरनार व पंकज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले व वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान अपघातग्रस्त ट्रक पोलिस स्टेशन ला जमा करण्यात आला आहे माञ ट्रकचालक पसार झाला आहे.

याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला ट्रकचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज